मंडणगडात येणाऱ्या नागरिकांचा वाढला ओघ ; प्रशासकीय यंत्रणा हतबल

The administrative system is weak influx of citizens increased
The administrative system is weak influx of citizens increased

मंडणगड (रत्नागिरी) : आडमार्ग व मुख्य पायवाटेने मुंबई, पुण्यातून मंडणगड तालुक्यात चालत दाखल होणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना तपासणीकरिता तालुक्यातील म्हाप्रळ व लाटवण या ठिकाणी व तीन क्कारंन्टाईन सेंटरवरील सर्व व्यवस्थांचे मॅनेजमेंट गेल्या चार दिवसात कोसळून पडले आहे. एका दिवसात 11 कोरोनाग्रस्त व पाच दिवसांच्या कालावधीत एकूण 13 कोरोनाग्रस्त तालुक्यात आढळून आल्याने यंत्रणा हादरून गेली आहे.

कोणत्याही पुर्वतयारी शिवाय कोरोना विरोधातील लढाईत दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली यंत्रणा गेल्या पाच दिवसात तालुक्यात नव्याने उद्भवलेल्या परिस्थीतीमुळे काहीशी हतबल झालेली दिसून आलेली आहे. शनिवारी 11 कोरोनाग्रस्त आढळून आलेली असताना म्हाप्रळ येथील तपासणी नाक्यात चक्क 108 नवीन नागरीक पाई चालत आले आहेत. त्यामुळे शहरातील एस.पी. कॉलेज येथील क्कारंन्टाईन सेंटरवर 78 नागरीक, धुत्रोली येथील क्कारंन्टाईन सेंटरवर 10 नागरीक तर म्हाप्रळ येथील क्कारंन्टाईन सेटंरवर 117 नागरीक, ग्रामिण रुग्णालय 2 नागरीक क्कारंन्टाईन करून ठेवण्यात आले आहेत.

मंडणगड तालुक्यातील चित्र

म्हाप्रळ येथील तपासणी नाका व दोन क्कारंन्टाईन सेंटरवर एकूण 22 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यात पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महुसल विभाग, शिक्षक कर्मचारी, पोलीस मित्र व आरोग्य मित्र अशी यंत्रणा उभी करण्यात आली. या कर्मचाऱयांना तपासणी व अन्य सेवा देताना आवश्यक असणारे मास्क, सॅनिटायझर, हॅडग्लोज, पुरेशा प्रमाणात नाहीत. तपासणी नाके व कोरंटाईन सेंटरवर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कर्मचाऱयांना आवश्यक असणारी सर्व साधनसामुग्री शासनाने वेळेवर उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही सुरक्षतेशिवाय तपासणी झाल्यास कामावर कार्यरत असणारे कर्मचारी संक्रमीत होऊ शकतात.

म्हाप्रळ चेक पोस्टवर शेकडों नागरिक दाखल

तालुक्यातील क्कारंन्टाईन सेंटरच्या इमारती या अन्य कारणांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सार्वजनीक वास्तू आहेत. इतरवेळी त्यांचा वापर शाळा, औद्योगीक शिक्षण संस्था, वसतीगृह इत्यादी कारणांसाठी होत असल्याने क्कारंन्टाईन सेंटरवर मोठय़ा संख्येने आलेल्या नागरीकांच्या गरजा भागवेल इतका पाणी साठा नाही, येथील स्वच्छतागृहे नागरीकांना अपुरे पडत आहेत. मंडणगड शहरातील दोन केंद्रांवर या ना त्या प्रकारे तालुक्यात दाखल झालेले 13 संक्रीमीत रुग्ण आढळून आलेले असतानाही केंद्रे व त्यांच्या आसपासचा तीन किलोमींटरचा परिसरही अद्याप कटेंन्टमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आलेला नाही. लाँक डाऊनच्या कालवधीत स्थानीक यंत्रणेने उत्तम काम केलेले असले तरी बदलत्या परिस्थितीत प्राप्त यंत्रणा कोलमडून पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com