पदवी प्रवेशाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट अंतिम मुदत होती. त्यानंतर ती 4 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.

सावंतवाडी : राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत 10 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका, बारावीनंतरच्या औषध निर्माण शास्त्र, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे. 

हेही वाचा - ...तेव्हाच तुमच्या शाळेसाठी मुख्याध्यापक पद मंजूर होणार ; ही आहे अट

सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट अंतिम मुदत होती. त्यानंतर ती 4 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. मात्र कोरोना संसर्गाच्या काळात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक कागदपत्रे तसेच विविध दाखले मिळवण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. याकरिताच ही प्रक्रिया 10 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दिली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या प्रवेश सुविधा केंद्रावर किंवा www.dtemahararhrta.gov.in या वेबसाईटवर माहिती घ्यावी. 
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the admission date of undergraduate students increases till 10th september in sindhudurg