सावधान- आता व्हॉट्‌सऍप होतेय "हॅक' 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

तुमचे बीएसएनएल सिमकार्ड "एक्‍स्पायर' होणार आहे, असा "मेसेज' ऍड. भावे यांना एका मोबाईलवरून येताच त्यांनी त्या क्रमांकावर "कॉल' केला. मात्र

रत्नागिरी : येथील विधीज्ञ दिलीप भावे यांचे व्हॉट्‌सऍप हॅक करून त्यावरून अश्‍लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार येथे आज घडला. या धक्कादायक घटनेतून इतरांनी सावध व्हावे व सोशल मीडियाचा योग्य काळजी घेत वापर करावा, असे आवाहन ऍड. दिलीप भावे यांनी केले आहे. 

कोकणात वकिलाचे व्हॉट्‌सऍप झाले "हॅक' 
तुमचे बीएसएनएल सिमकार्ड "एक्‍स्पायर' होणार आहे, असा "मेसेज' ऍड. भावे यांना एका मोबाईलवरून येताच त्यांनी त्या क्रमांकावर "कॉल' केला. मात्र, समोरच्याने तो स्वीकारला नाही. थोड्या वेळाने पुन्हा त्या नंबरवरून भावे यांना "कॉल' आला व सिमकार्ड बंद न पडण्याकरिता एक ऍप डाउनलोड करावयास सांगितले. ऍड. भावे यांनी सदरचे ऍप डाउनलोड केल्यावर समोरील व्यक्तीने नेटबॅंकिंगद्वारे 11 रुपये भरण्यास सांगितले.

सदर प्रकार संशयास्पद वाटताच ऍड. भावे यांनी मी ऑनलाईन पेमेंट न करता ऑफिसला येऊन पेमेंट करतो, असे सांगितले व कॉल कट केला. यानंतर ऍड. भावे यांनी आपले व्हॉट्‌सऍप अकाउंट "ओपन' करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते झाले नाही. त्यानंतर लगेचच ऍड. भावे ज्या ग्रुपमध्ये होते, त्यातील ग्रुप सदस्यांनी "कॉल' करून कळविले, की तुमच्या क्रमांकावरून अश्‍लील फोटो व व्हिडिओ आले आहेत. तसेच, "डीपी' बदलून त्या ठिकाणी अश्‍लील फोटो ठेवण्यात आला. ऍड. भावे यांनी याबाबत तत्काळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, याबाबत सायबर सेल अधिक तपास करीत आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advocate of Ratnagiri WhatsApp hacked crime marathi news