चिपळूणातील त्या सत्याग्रहींचा खटला लढवणारे अ‍ॅड. सुधीर चितळे यांचे निधन...

advocate sudhir chitale from chiplun is no more
advocate sudhir chitale from chiplun is no more

चिपळूण - येथील अ‍ॅड. सुधीर चितळे (वय. 70) यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणार्‍या कोणीही लढवायला तयार नव्हता. अ‍ॅड. सुधीर चितळे यांनी त्यांचा खटला लढवला. ते शेवटपर्यंत सत्याग्रहींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले होते. ख्यातनाम आणि अभ्यासू वकीला बरोबर जिल्ह्यातील हजारो लोकांचा मार्गदर्शक हरविल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. 

अनेक संस्थांचे त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले शिस्तप्रिय, निस्वार्थी निगर्वी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे वडील परशुराम चितळे हेही कायदेतज्ञ आणि चिपळूणचे नगराध्यक्ष होते. वकीली क्षेत्रात नव्याने येणार्‍याला ते मार्गदर्शन करायचे. 45 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वकीली केली. त्यांनी अनेकांना घडविले आहे. ब्रिफ ने भरलेली कपाटे त्यांच्या अभूतपूर्व यशाची मुकी साक्षीदार होती. त्यातच त्यांचा नीटनेटकेपणा जाणवायचा. खटल्यामध्ये टिपणी तयार करताना ते विविध रंगांचे पेन वापरायचे. त्यामुळे कागद विविध रंगांनी नटून जायचे. चिपळूणला जिल्हा सत्र न्यायालय होण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. ते राजकारण विषयाचे अभ्यासक होते. येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीचे काही काळ ते अध्यक्ष होते. चिपळूण तालुका ब्राह्मण सेवा सहकारी पतसंस्थेचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com