..तर इच्छुकांचा पत्ता कट होणार?

निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी उमेदवारांची घोषणा केली जाईल.
shivsena-ncp
shivsena-ncpesakal
Updated on: 
Summary

निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी उमेदवारांची घोषणा केली जाईल.

रत्नागिरी : आगामी नगरपालिका निवडणुकीत वरिष्ठांनी आदेश दिले तर शिवसेना (Shivsena) ही राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसबरोबर आघाडी करू शकते, असे संकेत नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिले. याविषयी शिवसैनिकांत लगेचच प्रतिक्रिया उमटत असून, बहुसंख्य शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची सूचना केली. (Konkan News)

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (१२) संध्याकाळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बैठक घेतली. यावेळी सर्व नगरसेवक, शहरातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पालिका निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या पाच वर्षांत केलेली कामे, नागरिकांच्या मागण्या, नगरसेवकांनी घेतलेल्या बैठकांना मिळालेला प्रतिसाद, भविष्यात करावयाची कामे यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत प्रत्येक नगरसेवकाचे आघाडी विषयाचे मत जाणून घेण्यात आले. सर्व नगरसेवकांनी आघाडीपेक्षा स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली. आपल्याकडे प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करता येतील. सध्या सुरू असलेली कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. त्यामुळे शिवसेनेला चांगले यश मिळू शकेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

shivsena-ncp
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या 'या' उत्तराने जिंकली परीक्षकांची मनं

प्रत्येक इच्छुकाने शिवसैनिक म्हणून काम करावे. निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी उमेदवारांची घोषणा केली जाईल. तोपर्यंत पक्ष म्हणून काम करत राहावे. बंडखोरी कोणीही करू नये. प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी दिली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगून आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, अशा सूचना दिल्या.

इच्छुकांचा पत्ता कट होणार

आघाडी झाली तर काही इच्छुकांचा पत्ता कट होणार हे निश्चित आहे. हा फटका कुणाला बसणार यावरून अंदाज बांधले जात आहेत. तसेच निवडणुकीपूर्वी आठ दिवस उमेदवारांना तिकीट मिळणार असल्यामुळे गोंधळात भर पडली आहे.

shivsena-ncp
पराभूत झालेल्या शिवसेनेच्या माजी आमदारांना शिवधनुष्य पेलवणार?

"आगामी निवडणूक लक्षात घेऊन आढावा बैठक घेण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आघाडीबाबत मतेही जाणून घेण्यात आली."

- बिपीन बंदरकर, शहरप्रमुख, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com