आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचा जनआक्रोश...

agitation In front of the Provincial Office kokan marathi news
agitation In front of the Provincial Office kokan marathi news

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भाजपाचा विश्वास घात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. ,फडणवीस सरकारने मंजुरी दिलेल्या विकासकामांची स्थगिती व महिलांवर होणाऱ्यां अत्याचारा विरोधात सरकारचा निषेध म्हणून तालुका भाजपाच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थित निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार श्री. शेळके यांना देण्यात आले.
यावेळी राजन तेली यांनी सरकारवर टिका करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी ग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळ बागायतदारांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती श्री फडणवीस मुख्यमंत्री असताना अवकाश ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही मदत आणखी वाढवू असेही त्यावेळी जाहीर केले होते.

बहुसंख्य शेतकऱ्यांना  कर्जमाफीचा फायदा नाही

मात्र महाविकास आघाडी सरकारने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 8 हजार पेक्षा एक रुपयाची ही अधिक मदत दिलेली नाही, सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणार्‍या महाआघाडीच्या नेत्यांनी यापैकी आश्वासन पाळलेले नाही. सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदत पीक कर्ज माफ केली आहेत. केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश न केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय करण्यात आलेला आहे.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यात राज्यातील महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसवण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला  जिवंत जाळणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ॲसिड हल्ला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरुणी मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे. येणाऱ्यां काळात यात सुधारणा नाही झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. 

या सरकारने केले काय स्थगिती शिवाय आहे काय
प्रांत कार्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. .यावेळी भारतीय जनता पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, महा विकास आघाडी विकास कामे बिघाडी, या सरकारचे चालले काय खाली डोके वर पाय, या सरकारने केले काय स्थगिती शिवाय आहे काय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. आंदोलकांचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उशिरा भेट घेतली यावेळी यांच्या उपस्थितीत शासनाच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.

सहभागी
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, दादू कविटकर, तालुकाध्यक्ष महेश धुरी, संदीप गावडे, सिध्दार्थ भांबूरे, दिलीप भालेकर, अजय गोंदावले, सत्यवान बांदेकर ,संजू विरनोडकर, निशांत तोरसकर, शेखर गावकर ,पंढरीनाथ राऊळ, दिपाली भालेकर, उन्नती धुरी, प्राजक्ता केळुसकर, मोहिनी मडगावकर, मिस्बा शेख, सभापती मानसी धुरी, पल्लवी राऊळ, शर्वाणी गावकर, मकरंद तोरसकर, वासुदेव परब, अनिल परब, दत्ता कोळमेकर,प्रसाद अरविंदेकर, विकास केरकर, उपसभापती शितल राऊळ, प.स सदस्य पंकज पेडणेकर, रविंद्र मडगावकर, स्वागत नाटेकर,शेखर गावकर, प्रमोद गावडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com