रत्नागिरीत भोंग्याविना सकाळी अजान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत भोंग्याविना सकाळी अजान

रत्नागिरीत भोंग्याविना सकाळी अजान

रत्नागिरी: अजानाबाबत रत्नागिरीतली मुस्लिम बांधवांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात दररोज सकाळची अजान भोंग्याचा वापर न करता होईल, असे मुस्लिम बांधवांनी रत्नागिरी पोलिसांसमोर स्पष्ट केले. भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी या वेळी स्पष्ट केले. शहर पोलिस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठीत हा निर्णय झाला.

राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांचा विषय चर्चेत आहे. त्याला मनसेने यामध्ये पुढाकार घेऊन जिथे भोंगा वाजेल तिथे हनुमान चालिसा पठण करण्याचे घोषित केले. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात उद्यापर्यंत चोख पोलिस बंदोबस्त आहे, मात्र यामध्ये मुस्लिम बांधवांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने त्याचे स्वागत करण्यात आले. आजपासून मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी रत्नागिरी शहरातील मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी आणि शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घेतली. यामध्ये सकाळची अजानही भोंग्याचा वापर न करता केली जाईल.

तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका या वेळी मुस्लिम बांधवांनी पोलिसांसमोर मांडली. कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची कल्पना देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम बांधवांच्या या भूमिकेचे पोलिसांनी स्वागत केले.

Web Title: Ajan Ratnagiri Morning Without Honking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RatnagiriSakalmnsmuslim
go to top