
रत्नागिरी : कसबा (ता. संगमेश्वर) येथे काहींनी केलेली गद्दारी, फितुरीमुळे औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले नंतर ज्या पद्धतीने त्यांना त्रास देण्यात आला ते तिथं बोलता पण येत नाही. अशा धाडसी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक येथे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला स्मारक पाहून अभिमान आणि जगाला हेवा वाटेल, अशा सुंदर पद्धतीने स्मारकाची उभारणी केली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.