अलिबाग : ’उमटे’तील पाण्यासाठी दिवाळीनंतर मुहूर्त

जल शुद्धीकरण केंद्राच्या रोहित्रासाठी हालचाली सुरू; ६५ पेक्षा अधिक गावांना दिलासा
उमटे धरण
उमटे धरणsakal
Updated on: 

अलिबाग : तालुक्यातील उमटे येथील धरणावरील जल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाले नसल्याने ६५ पेक्षा अधिक गावांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. या संदर्भात नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर संबंधित यंत्रणेने १४ लाख लिटरच्या साठवण टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी २०० केव्ही क्षमतेच्या रोहित्राची मागणी केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दिवाळीनंतर शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा विश्‍वास पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

अलिबाग तालुक्यातील सुडकोली, कुदेपासून रामराज, तळवली, उमटे, बोरघर, महाजने, वावे, मल्याण, घोटवडे, रेवदंडा, नागावा, आक्षी, बेलकडे, ढवर, सहाण, खानाव, वढाव या परिसरातील ६५ गावांसाठी उमटे धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु ४० वर्षे जुन्या या धरणासाठी जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने माती मिश्रित पाणीपुरवठा होतो.

उमटे धरण
ऐतिहासिक प्रतिकृतींना गुल्हानेंचा ‘फोम’टच!

या प्रकारामुळे नागरिकांनी वारंवार संताप व्यक्त केला होता. त्यानंतर धरणाजवळ जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. एक कोटी २० लाख रुपयांचा निधी त्यावर खर्च करण्यात आला आहे. हे केंद्र गणेशोत्सवानंतर सुरू होण्याची अपेक्षा होती; परंतु या केंद्रातील साठवण टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्‍यक विद्युत यंत्रणा सक्षम नाही. आता २०० केव्ही क्षमता असलेल्या रोहित्राची आवश्‍यकता आहे. त्यासाठी महावितरणकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने मागणी केली आहे.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या टाकीत पाणी सोडण्यासाठी आवश्‍यक वीज यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे २०० केव्ही क्षमता असलेले रोहित्र बसविण्यात येणार आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांबरोबर संपर्क झाला आहे. नवीन रोहित्र बसविल्यास दिवाळीनंतर केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.

- एकनाथ कुदळे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद

उमटे धरणामध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम संथगतीने होत असल्याने नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. हा नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे.

- अमित म्हात्रे, बेलोशी रामराज विभाग संघटक, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pali Ramdas Athawale Constitution Statement RPI To Connect All Communities With Its Social Justice And Equality Agenda
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com