रत्नागिरी जिल्ह्यातील चारही आमदार शिवसेनेबरोबर

शिवसेनेत अंतर्गत बंडाळी माजली असून पक्षात उभी फुट पडली आहे. ज्य़ेष्ठ शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी नाराजी दाखवत पक्षाविरोधी बंडाचा झेंडा उगारला आहे.
Shivsena
ShivsenaSakal
Summary

शिवसेनेत अंतर्गत बंडाळी माजली असून पक्षात उभी फुट पडली आहे. ज्य़ेष्ठ शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी नाराजी दाखवत पक्षाविरोधी बंडाचा झेंडा उगारला आहे.

रत्नागिरी - शिवसेनेत अंतर्गत बंडाळी माजली असून पक्षात उभी फुट पडली आहे. ज्य़ेष्ठ शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी नाराजी दाखवत पक्षाविरोधी बंडाचा झेंडा उगारला आहे. पक्षासह अपक्ष मिळुन त्यांच्यासोबत २९ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकस आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार आमदारांनी आपली निष्ठा पक्षाशी आहे. अडचणीच्या वेळी आम्ही शिवसेना पक्षाबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट करीत जिल्ह्यातील सेना अभेद्य असल्याचे दाखवून दिले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागताच महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळी मोठा भुकंप झाला. निवडणुकीत मते फुटल्याने करुघोड्यांचे राजकारण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे नगरविकास मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेतील नाराज आमदारांचा फोन काल सायंकाळपासून नॉटरिचेबल होता. याचे गुड उशिरा उलके आणि पक्षातील अंतर्गत वादातुन त्यांनी स्वतंत्र गट करून सुरतला रवाना झाल्याचे स्पष्ट झाले. तेथील एका हॉटेलमध्ये हे आमदार असून भाजप त्यांच्या संपर्कात आहे. शिवसेनेसह महाविकस आघाडीला हा मोठा राजकीय धक्का आहे. आज सकाळीपासूनच प्रसार माध्यमातून येणार्‍या या वृत्तामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये खळबळ माजली. जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सध्या कोठे आहेत, याची चर्चा रंगु लागली.

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते अनिल परब आणि अन्य नेत्यांचे खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यातील कुरघोड्यांचे राजकारण सुरू होता. त्यामुळे योगेश कदम यांच्याविषयी विशेष चर्चा रंगली होती. योगेश कदम यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या रक्‍तात शिवसेना आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले. गुहागरचे शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनीही आपण चिपळुणात असून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत असल्याचे सांगितले. आपला वरिष्ठांशी संपर्क झाला असून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच जी जबाबदारी खांद्यावर देतील ती पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले.

राजापूर-लांजाचे आमदार राजन साळवी हे रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते. मात्र सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर ने पुन्हा मुंबईला रवाना झाले. आमदार साळवी यांच्या संपर्क साधला असता, आपण स्व. बाळासाहेबा ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. माझी निष्ठा ही बाळासाहेबांच्या पायाशी आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय आपण कोणताही विचार करणार नाही. आपण मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर काही आमदारांसोबत जात असल्याचे सांगितले. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी देखली आपली प्रतिक्रिया देत आपण या राजकीय घडामोडीमुळे सर्व कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटासाठी मुंबईला वर्षावर तळ ठोकुन असल्याचे सांगितले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य असून एकही आमदार फुटणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रतिक्रिया आमदारांनी दिल्या. कोणत्याही आमिषाला जिल्ह्यातील आमदार बळी पडणार नसल्याची ग्वाही यावेळी चारही आमदारांनी दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com