चाकरमानी कोकणात दाखल होताच या ठिकाणी होणार कोरोना रॅपिड टेस्ट....

शिवप्रसाद देसाई
Wednesday, 29 July 2020

सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची कोरोना रॅपिड टेस्ट होणार..

खारेपाटण :  सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची कोरोना रॅपिड टेस्ट खारेपाटण चेकपोस्ट परिसरात होणार आहे. त्या अनुषंगाने उभारण्यात येणारी लॅब आणि चाकरमान्यांच्या व्यवस्थेची पाहणी प्रांत वैशाली राजमाने यांनी आज केली. चेकपोस्टवरच रॅपिड टेस्ट होणार असल्याने चाकरमान्यांसह जिल्हावावीयांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा- त्यामुळे आल्या सिंधुदुर्गातील या प्रसिध्द दोन नद्या चर्चेत.... -

गणेशोत्सवात सिंधुदुर्गात सुमारे एक ते दीड लाख चाकरमानी दाखल होण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक गावातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येचा आढावा घेतला जात आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची रॅपिड टेस्ट करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने खारेपाटण चेकपोस्टवर रॅपिड टेस्ट साठी लॅब, चाकरमान्यांसाठी मंडप व इतर सुविधांची उभारणी केली जात आहे. प्रत्येक चाकरमान्याची टेस्ट झाली तर तो आणि त्याच्या संपर्कातील व्यक्‍तींचे तातडीने विलगीकरण करणे शक्‍य होणार आहे. यातून कोरोनाचा समूह संसर्ग देखील टाळता येणे शक्‍य होणार आहे. या वेळी तहसीलदार रमेश पवार, मंडल अधिकारी मंगेश यादव, तलाठी रमाकांत डगरे, पोलिस उपनिरीक्षक खंडागळे, सरपंच रमाकांत राऊत, रफिक नाईक उपस्थित होते. 

हेही वाचा- दहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी... -

खारेपाटण चेकपोस्ट; रॅपिड टेस्ट लॅबची प्रांतांकडून पाहणी​

जिल्ह्यात चाकरमान्यांचा ओघ सुरू आहे. गाड्यांच्या रांगा खारेपाटण चेकपोस्टवर आहेत. हा ओघ आणखी वाढणार आहे. मुंबई, पुणे येथे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे समुह संसर्गाचाही धोका जिल्ह्याला आहे. तो कमी व्हावा यासाठी बहुतांश सरपंचांनी १४ दिवस क्‍वारंटाईनबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधींकडून सात दिवसांची मागणी आहे. याबाबतचा नेमका निर्णय राज्य शासनाकडून येण्याची अपेक्षा आहे.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All kokani people Corona Rapid Test at Kharepatan checkpost in sindhudurg