कुडाळ - वैभव नाईक जेव्हा आमदार होते, तेव्हा बिडवलकर खून प्रकरणाचा गुन्हा घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा होती, मग या गुन्ह्याची माहिती नक्कीच त्यांना होती. मग त्यावेळी त्यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्यामुळे नाईक यांना या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट पैसे देत असल्याचा संशय निर्माण होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. यामध्ये आमचे कोणी पदाधिकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हा लपवला म्हणून माजी आमदार नाईक यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.