

Experts believe the invasive predatory fish may threaten native aquatic species and are urging authorities to investigate their origin.
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील अंबा नदीच्या पात्रात काही दिवसांपूर्वी मृत अवस्थेत सापडलेल्या दुर्मिळ चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा 'अल्बिनो एलीगेटर गार' माशाच्या घटनेला आता एक नवे आणि आश्चर्यकारक वळण मिळाले आहे. अंबा नदीत आता हे परदेशी मासे जिवंत पणे मासेमारांच्या जाळ्यात सापडत असून, धक्कादायक बाब म्हणजे हे मासे थेट स्थानिक मासळी बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत.