पाली - अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे सुधागड तालुक्यातील भेरव गावाजवळ असलेल्या अंबा नदी पुलावरून सोमवारी (ता. 18) दुपारी पाणी गेले. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली अशी माहिती पाली पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी दिली. व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.