

Rescue volunteers and police personnel recovering the body of a drowned cowherd from the Amba rive
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावाजवळील अंबा नदी पात्रात सोमवारी (ता. 8) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास म्हशी आणण्यासाठी गेलेला गुराखी झिमा तुकाराम बावधाने (वय 55 वर्ष ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (ता.9) सकाळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची व रेस्क्यू टीम आणि पाली पोलीस यांच्या मदतीने अथक प्रयत्नाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.