Amba River Pollution: अंबा नदीचे पाणी शेवाळ आणि केमिकलमुळे प्रदूषित; पालीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Algae and Suspected Chemicals Affect Amba River Water Quality: २५ कोटींची शुद्ध पाणी योजना रखडली; अंबा नदीच्या पाण्याबाबत नागरिकांचा संताप, आरोग्याचा प्रश्न गंभीर
Pali Water Pollution Raises Concern as Amba River Shows Algae and Suspected Chemical Layers Near Drinking Water Source

Pali Water Pollution Raises Concern as Amba River Shows Algae and Suspected Chemical Layers Near Drinking Water Source

esakal

Updated on: 

पाली: सुधागड तालुक्यासह खालापूर, रोहा व पेण आदी तालुक्यातून वाहणारी व अनेकांची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीतून पाली शहराला पाणी पुरवठा होतो. तसेच सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणी देखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. मात्र सध्या अंबा नदीचे पाणी शेवाळ व केमिकलचा तवंग यामुळे प्रदूषित झाले आहे. पाण्यावर शेवाळ व रसायनामुळे हिरवट, पिवळा व लालसर तवंग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, भाविक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Loading content, please wait...