सावंतवाडी : आंबोली येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी (Amboli Police) गोव्यातून गुजरातकडे (Gujarat) होणारी दारू वाहतूक रोखली. याप्रकरणी वाहन चालक शैलेश कुमार रामाभाई बारिया (रा. पंचमहाल, गुजरात) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सहा लाखांची दारू व १० लाखांच्या वाहनासह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनामध्ये पत्र्याचा कप्पा करून त्यातून दारू वाहतूक केली जात होती. ही कारवाई काल सकाळी साठेआठच्या सुमारास करण्यात आली.