अमेरिकेतही चमकले केळंबेतील आकाशकंदील

नीलेश सुवारेंचे यश; ऑस्ट्रेलियात निर्यातीत घट
america
americasakal media
Updated on

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील केळंबेसारख्या खेडेगावातून आकाशकंदील थेट अमेरिकेत पोचले आहेत. तेथील उद्योजक नीलेश सुवारे यांच्या दीपसंस्कृती ब्रँडचे आकाशकंदील आता अमेरिकेच्या अवकाशात आपले स्थान मिळवून आहेत. या वर्षी कोरोनाचे सावट असतानाही दोन हजारपेक्षा अधिक आकाशकंदील सुवारे यांनी निर्यात केले. त्यापैकी एक हजार तर त्यांनी थेट अमेरिकेत पाठवले.

केळंबे येथील सुवारे आणि त्यांचे सहकारी तसेच कुटुंबीय यांच्या या स्टार्टअपमुळे आकाशकंदील हे त्यांच्यासाठी समृद्धीचे दीप ठरले आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अर्थात दोन दिवाळ्या आणि यावर्षीची दिवाळी कंदिलांसाठी फारशी प्रकाशमान नव्हती. त्यामुळे उत्पादन किती करायचे, यावर नेमका निर्णय घेता येत नव्हता. त्यामुळे यंदा उत्पादन थोडे कमी घेतले.

मात्र, ते कंदील बाजारात उचलले गेल्यामुळे अखेरीस कमी पडले. याआधीही अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात आकाशकंदील निर्यात करण्यात आले होते. याबाबत अमेरिकेतील राहुल चौगुले यांनी यांनी आपल्या घराशी लावलेल्या दीपसंस्कृतीच्या आकाशकंदिलांचा फोटो सोशय मीडियावर पाठवला आहे. २८२७, ओल्ड हॉकिन्स लेन, प्रिस्को, टीएक्स, ७५०३३, अमेरिका या ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी केळंबेत बनलेला कंदील दिमाखात लावला आहे. त्यांनी लावलेला कंदील पाहून त्यांच्या अमेरिकेतील काही मित्रांनीही कंदील घेतले.

इंडियन स्टोअर्समध्ये विकले

यावर्षी सुवारे यांनी एकूण ३५ हजारच्या दरम्यान कंदिलांचे उत्पादन घेतले. त्यामध्ये २० प्रकारची डिझाईन्स आहेत. ती त्यांनी स्वतः बनवलेली आहेत. अमेरिकेमधील इंडियन स्टोअर्समध्ये त्यांचे कंदील विकले गेले. प्रामुख्याने भारतीय लोकांनीच ते खरेदी केले. अमेरिकेसह ऑस्ट्रेलियात दीपसंस्कृतीतर्फे चारशे आकाशकंदील थेट पाठवण्यात आले. कोविडमुळे तेथील अटी काहीशा जाचक असल्याने यावर्षी ऑस्ट्रेलियात कमी कंदील पाठवता आले. यासह कोविडच्या वातावरणात उत्पादनही कमी घेण्यात आले होते. मात्र, यापुढे कंदील संस्कृती अमेरिकेत रुजवण्याचा प्रयत्न तेथील भारतीय करतात, त्यांना साह्य करण्यासाठी सुवारे यांनी कंबर कसली आहे.

"अमेरिकेत दिवसेंदिवस वाढत्या संख्येने कंदील निर्यात होत आहेत. क्लिंटन यांच्या काळापासून व्हाईट हाऊसवरही दिवाळी साजरी होते. तेथे आमच्या ब्रँडचा आकाशकंदील चमकावा, अशी इच्छा आहे."

- नीलेश सुवारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dhamanse Hatwadi Bridge Ratnagiri
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Shaktipeeth Highway latest update
Raigad Viral Video
Marathi News Esakal
www.esakal.com