रत्नागिरी : शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजा कालीन बुद्धविहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर व म्युझियमच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध (Buddhist) जनतेमध्ये असंतोष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला आहे. त्याअनुषंगाने काल शासकीय विश्रामगृहात सभा झाली. थिबा राजा कालीन बुद्धविहारासाठी राखीव ठेवलेली जागा पुन्हा बुद्धविहारासाठी आरक्षित करण्यात यावी, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व सर्वतोपरी सहकार्य करेन, असे स्पष्ट करीत या लढ्याला आंबेडकर यांनी पाठिंबा दिला.