Loksabha 2019 :गीतेंचा अर्ज भरताना डॉ. नातू गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज अलिबाग (जि. रायगड) येथे भरला. यावेळी गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस डॉ. विनय नातू अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमागे नक्की काय दडलय याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. 

चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज अलिबाग (जि. रायगड) येथे भरला. यावेळी गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस डॉ. विनय नातू अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमागे नक्की काय दडलय याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचे गीतेंसमोर तगडे आव्हान आहे. सेना, भाजपची युती झाल्यामुळे गीतेंना दिलासा मिळाला.

तर्कवितर्कांना उधाण
गुहागर विधानसभा मतदारसंघात मताधिक्‍य मिळवण्यासाठी गीतेंना डॉ. नातूंची मदत घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून डॉ. नातू संपूर्ण जिल्ह्यात फिरत आहेत. रायगडमधून आज गीतेंनी अर्ज भरला, त्यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र डॉ. नातू अनुपस्थित राहिल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सेना, भाजपची युती झाली असली तरी युतीच्या रेशीमगाठी जुळेनात अशी स्थिती रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. मात्र युतीतील प्रमुख भाजपच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान गीतेंसमोर आहे. केंद्रातील सत्तेत भाजपने शिवसेनेला अनंत गीते यांच्या रूपाने एकमेव मंत्रिपद दिले. गीतेंनी पाच वर्ष भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. त्यामुळे गीतेंबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करण्याची शक्‍यता आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांची भूमिका महत्त्वाची आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Gite fill application form for Loksabha 2019