
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आलेली आर्थिक मंदी आणि दुष्काळ यांचा सामना करण्यासाठी आणि लोकांना अन्न उपलब्ध व्हावे यासाठी हरितक्रांतीचा पुरस्कार करण्यात आला होता; मात्र पुढील २० वर्षांतच म्हणजे १९८०च्या दशकात हरितक्रांतीच्या दुष्परिणामांबद्दल जाणीव वाढू लागली. त्यामध्ये मुख्यत: शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, मातीची सकसता नष्ट होणे आणि पर्यावरणीय प्रदूषण यांचा समावेश होता. या समस्यांना उत्तर म्हणून शाश्वत आणि रसायनमुक्त शेतीपद्धतींकडे वाढती चळवळ दिसून आली. यात बीज बचाओ आंदोलन आणि नवदान्य या संस्थांचा मोठा वाटा आहे. या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे मूल्य अधोरेखित केले. शेतीमधील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि स्थानिक छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी रसायनमुक्त शाश्वत शेतीला पर्याय नाही, हे या चळवळीने ठसवले...!
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था