शिवकाळात येरडव परिसरात रहदारी सुरू होती. या वाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणात येत होते, असे सांगितले जाते. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठीही मुघल सैन्य या पायवाटेने कोकणात खाली उतरले.
राजापूर : राजापूर आणि कोल्हापूरच्या सीमेवर वसलेल्या येरडव गावाच्या हद्दीत अणुस्कुरा घाटमाथ्यावर असलेले पुरातन पांडवकालीन श्री उगवाईदेवी मंदिर (Ugwai Devi Temple) आणि ऐतिहासिक शिलालेख प्रकाशझोतात आला आहे. जीर्णावस्थेत असलेल्या हा राजापुरातील ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा, मंदिर संवर्धन व्हावे त्यासोबत त्या परिसराचा पर्यटनादृष्ट्या विकास व्हावा यासाठी राजापूरवासीयांनी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना निवेदन दिले आहे.