सिंधुदुर्गात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

सिंधुदुर्गात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

सिंधुदुर्गनगरी - संपुर्ण राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांनी आज जेलभरो आंदोलनाचे आयोजन केले होते. त्यानुसार आज सिंधुदुर्गातही जेल भरो आंदोलन झाले.

राज्यभरात विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सिंधुदूर्गातील सुमारे एक हजार सत्तर अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या - 

  • केंद्र सरकारने  वाढविलेले मानधन तातडीने द्यावे.
  • सेवा समाप्ती लाभ तिप्पट करावा 
  • हा लाभ 2005 पासून सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळावा.
  • टी. एच. आर. रद्द करून ताजा आहार द्यावा.
  • रजिस्टरे, अहवाल छापून द्यावेत.
  • रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात.
  • अनुकंपाखाली कर्मचारी यांचे नातेवाईकाना सेवेत घ्यावे

दरम्यान, या चार वर्षांमध्ये या सरकारने अंगणवाडी सेविकांना अच्छे दिन येतील, असे सांगितले. मात्र हे अंगणवाडी सेविकेचे भयंकर बुरे दिन आले असेच म्हणावे लागेल. 2014 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सेविकांना अजून पेन्शन मिळाली नाही.

2014 च्या निवडणूकीच्या आधी काँग्रेस सरकारला फार मोठे माजोरी झाली होती म्हणून शिवसेना-भाजपला लोकांनी निवडून दिले. पण या सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत तर त्याचा फटका येणाऱ्या निवडणूकीत निश्चितच बसेल.

- कमल परुळेकर, महाराष्ट्र सरचिटणीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com