esakal | केसरकरांनीच सेटलमेंटसाठी दिली होती ऑफर; परब यांचा गौप्यस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांनीच सेटलमेंटसाठी दिली होती ऑफर;  परब यांचा गौप्यस्फोट

केसरकरांनीच सेटलमेंटसाठी दिली होती ऑफर; परब यांचा गौप्यस्फोट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सावंतवाडी : शिवसेना प्रवेशासाठी आपल्याकडे २ कोटी ७० लाख मागितल्याचा आरोप करणारे आमदार दीपक केसरकर धादांत खोटारडे आहेत. उलट दोन दिवसांपूर्वी केसरकरांनीच सेटलमेंटसाठी एक माणूस माझ्याकडे पाठवून तुम्ही एमटीडीसीचा विषय थांबवा, मी ठेकेदाराला तुम्हाला भेटायला पाठवतो, अशी ऑफर केली होती, असा गौप्यस्फोट केला. शिवाय यापुढे माझ्याविरोधात बोलाल तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.

येथील पालिकेच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष परब यांनी आमदार केसरकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. परब म्हणाले, 'केसरकर यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायला हवी होती. तुमच्या पूर्वजांनी जमिनी कशा घेतल्या हे देखील माहीत आहे. त्यामुळे यापुढे खोटे आरोप करणे बंद करा, नाहीतर तुमचे मुंबई प्रकरण बाहेर काढावे लागेल.

हेही वाचा: पुढचे 4 दिवस कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा

मी जर सेना प्रवेशासाठी पैशांची ऑफर केली होती तर मग एवढे दिवस केसरकर गप्प का राहिले? माझ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी हा कथित पोलखोल का केला नाही? मुळात स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच आता सैरभैर झालेले केसरकर खोटे बोलत आहेत. उलट मी सेनेत प्रवेश करावा, यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले होते. अनेकांनी माझ्याकडे पाठवले होते. माझ्या वाढदिनी केंद्रीय मंत्र्यांना घेऊन माझ्या कार्यालयात पायघड्या घालायला कोण आले होते? शिवसेनेत जायचे असते तर केसरकरांकडे मी का गेलो असतो? मी कोणालाही भेटायला गेलो नाही. मला पैशाने विकत घेणारा या जिल्ह्यात कोण नाही. त्यामुळे केसरकरांनी अधिक बोलायला भाग पाडू नये.'

loading image