

ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Sakal
पाली : पारंपरिक सणांना केवळ रूढी-परंपरांमध्ये न अडकवता त्याला सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याचा एक कौतुकास्पद प्रयोग पेणमध्ये पाहायला मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेण यांच्या वतीने वटसावित्री ते वटधरित्री या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. पेणमधील विविध समविचारी महिला संघटनांनी या मोहिमेत एकत्र येत प्रत्यक्ष कृतीतून धरित्रीला हिरवाईने नटवण्याचा संकल्प केला.