अडचणीत आहात, तर करा ‘डायल ११२’

तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा; २०९ प्रशिक्षित कर्मचारी, ५६ वाहने, टीम १० व्या मिनिटाला दाखल
dial 112
dial 112sakal media

रत्नागिरी : तुम्हाला अचानक काही अडचण आली, तुमच्यावर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे, तर घाबरू नका. तुमच्या मदतीला आहे ‘डायल ११२’ हा क्रमांक. पोलिस नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ त्या व्यक्तीचे लोकेशन मिळते. त्यानंतर पोलिसांची एक टीम दहाव्या मिनिटाला घटनास्थळी दाखल होऊन संबंधिताला मदत करते. गेल्या महिनाभरात असे सुमारे ८० कॉल नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले असून, अडचणीतील लोकांना डायल ११२ टीमने मदत केली आहे. जिल्ह्यात ५६ गाड्यांवर २०९ प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत.

dial 112
एसटी महामंडळ विलिनीकरणासाठी लवकरच GR निघणार

जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर २०२१ मध्ये ही यंत्रणा जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये कार्यान्वित केली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या नियंत्रणाखाली ही यंत्रणा सुरू आहे. विशेष म्हणजे यामुळे मुख्यालयातील १०० नंबरला येणारे ४० टक्के बोगस कॉल आणि क्रॉस कनेक्शन बंद झाली आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांचा तेवढा ताप कमी झाला आहे. ‘डायल ११२’ ही यंत्रणा आपत्कालीन स्थितीत सापडणाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने शासनाच्या पुढाकाराने सुरू झाली आहे. जिल्हा पोलिस दलातील सुमारे २०९ कर्मचाऱ्यांना आणि चार ते सहा अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अत्याधुनिक चारचाकी आणि दुचाकी वाहने त्या पथकाला दिली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे या यंत्रणेशी जोडले गेले आहे. दिवसाला साधारण पाच ते सहा कॉल येतात.

dial 112
ST कर्मचारी संप : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू - अनिल परब

लोकेशनची खात्री करून..

अडचणीत सापडलेल्यांना तातडीची मदत मिळावी, या उद्देशाने ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कॉल आल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या लोकेशनची खात्री करून ही टीम दहाव्या मिनिटाला तिथे दाखल होते. त्याला प्राथमिक मदत करून संबंधित विषय स्थानिक पोलिस ठाण्यात वर्ग केला जातो.

एक ना अनेक तक्रारी

नवरा दारू पिऊन विनाकारण मारहाण करत आहे, शेजारी नाहक त्रास देत आहे, घरात भांडण सुरू आहे, अपघात झाला आहे, वाहतूक कोंडी झाली आहे, शेजारी मोठ्याने लाऊड स्पीकर लावला आहे, गाडी बंद पडली आहे, रस्त्यावर मारहाण झाली आहे, अशा तक्रारींचे दररोज कॉल सुरू आहेत. गेल्या महिनाभरात डायल ११२ ला ८० कॉल आले आहेत.

एक नजर..

  • सुविधा नवीन, तरी दिवसाला ५ ते ६ कॉल

  • जवळच्या पोलिस ठाण्यामार्फत मदत केली जाते

  • जिल्ह्यात ५६ वाहनांची फौज तयार

  • टॅब व त्यावर लोकेशन वाहनातून पाहता येते

  • पोलिस ठाण्यांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने

  • माहिती मिळल्यावर १० मिनिटांत मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com