गुहागर : राज्य संरक्षित झालेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडावर (Gopalgad) येथील जागामालकाने केलेले अनधिकृत बांधकाम तातडीने काढून टाकावे, अशी नोटीस येथील जागामालकाला पुरातत्त्व विभागाने बजावली आहे, तर राज्य संरक्षित नोटिफिकेशनला आव्हान देणारी जागामालकांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने (High Court) निकाली काढली आहे. यामुळे अंजनवेलचा गोपाळगड किल्ला (Gopalgad Fort) अनधिकृत बांधकाममुक्त होणार आहे.