आमदार राणेंच्या आंदोलनाचा हेतू शुद्धच - अर्चना घारे

आमदार राणेंच्या आंदोलनाचा हेतू शुद्धच - अर्चना घारे

सावंतवाडी - कणकवली हायवे प्रश्‍नी आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या आंदोलनाची पद्धत चुक की बरोबर हा वेगळा भाग असला तरी मुळात त्याना हे आंदोलन का करावे लागले हा प्रश्‍न आहे. लोकांच्या भावना लक्षात घेता राणे यांच्या आंदोलनाचा हेतू शुद्ध होता, असे सांगत राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे-परब यांनी राणे यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. 

हायवेच्या परिस्थिती गणेश चतुर्थीपूर्वी न सुधारल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून सदशिल मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही घारे-परब यांनी दिला. 
सौ. घारे-परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, ""जिल्ह्यातून जाणाऱ्या हायवेच्या एकूणच परिस्थितीला पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. अधिकाऱ्यावर त्यांचा वचक नाही. आधिकारी त्यांचे ऐकत नाहीत असं त्यांनी या पूर्वीही जाहीरपणे संगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता वालीच राहिला नसल्याने व त्यांच्याकडून लोकांनी अपेक्षा सोडल्याने अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आमदार राणे यांना चिखलफेक सारखे आंदोलन करावे लागले.'' 

जिल्ह्याच्या रस्त्याच्या एकूणच परिस्थितीबाबत आपण माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले असून लवकर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे तीव्र धरण दुर्घटनेत अनेकांचे हकनाक बळी गेलेत. यामध्ये दोषी असणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याची तत्परता गृहराज्यमंत्री दाखवत नाही; मात्र लोकांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार राणे यांच्या सोबत त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवतात. त्यामुळे पालकमंत्री केसरकर हे यातुन सूड बुद्धीचे राजकारण करत आहेत, हेच सिद्ध होते.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com