राष्ट्रवादीच्या सावंतवाडी मतदारसंघ निरीक्षकपदी अर्चना घारे-परब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

सावंतवाडी - राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निरीक्षकपदी अर्चना संदीप घारे-परब यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले. 

सावंतवाडी - राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निरीक्षकपदी अर्चना संदीप घारे-परब यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले. 

सौ. अर्चना घारे-परब या विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या होत्या. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला याठिकाणी त्यांनी सामाजिक कार्याचा सपाटा लावला होता. मूळ सावंतवाडीच्या माहेरवासिणी असलेल्या सौ. घारे-परब या स्थापत्य अभियंत्या आहेत. लग्नानंतर त्यांनी पुणे-मावळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद भुषवित आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष पद, लोकनियुक्त महिला प्रतिनिधी संघ महाराष्ट्र राज्याचे सदस्यपद, पश्‍चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे संघटक पद, तर इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव पुणे या संस्थेचे संचालक पद आदी विविध पदावर त्यांनी काम केले आहेत. 

अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत नेत्र दान, आरोग्य तपासणी, मोफत पुस्तक प्रदर्शन आधी विविध उपक्रम राबवले आहेत. राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेसने त्यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविताना गाव कमिटी व बूथ कमिटी गठित करणे राष्ट्रवादीच्या कनेक्‍ट ऍपची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर प्रदेश कडून प्रशिक्षित व त्यांच्या बैठका आयोजित करून महिला युवती युवक विद्यार्थी यांचा पक्षात सहभागी करून घेण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. 

उमेदवारीवर दावेदारी? 
आघाडीच्या पारंपरिक जागावाटपात सावंतवाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे असते. दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर या मतदारसंघातील राष्ट्रवादीची संघटना खिळखीळी झाली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने पुन्हा संघटना बांधणीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सौ. घारे-परब यांना निरीक्षकपद दिले आहे. एकंदरीत त्यांचीही जबाबदारी लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्या प्रबळ दावेदार असू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Archana Ghare Parab as NCP Sawantwadi constituency Inspector