

Double Blow for Arecanut Growers: Falling Production and Rising Input Costs
esakal
-राजेंद्र बाईत, राजापूर
शासनाच्या महत्वाकांक्षी फळबाग लागवड योजनेचा फायदा घेत कोकणातील शेतकर्यांनी अनके आंबा-काजूच्या बागायती विकसित केल्या आहेत; मात्र, गेल्या दशकभरामध्ये सातत्याने वातावरणामध्ये झालेल्या बदलांचा आंबा-काजूला फटका बसत आहे. कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला तरी, उत्पादनातील घट थांबताना दिसत नाही. हवामान बदलाचा कमी परिणाम होणार्या आणि वर्षाकाठी दोनवेळा हमखास उत्पन्न मिळवून देणार्या सुपारी बागायतीकडे कोकणातील शेतकरी वळत आहे. मात्र सुपारीच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. यांमुळे सुपारी बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सुपारीचे नुकसान शासनदरबारी उपेक्षितच राहिलेली आहे.