Pali Robbery : तीन गावांत सशस्त्र दरोडा घातलेले दरोडेखोर अजूनही मोकाट; फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये 5 संशयित दिसले

4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीने फिल्मी स्टाईलने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले. मात्र आठवडा उलटून गेला तरी हे दरोडेखोर अजूनही मोकाटच.
Robbers
Robberssakal
Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये शनिवारी (ता. 26) रात्री पावणे दोन ते रविवारी (ता. 27) पहाटे सव्वा तीन वाजताच्या दरम्यान 4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीने फिल्मी स्टाईलने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले. मात्र आठवडा उलटून गेला तरी हे दरोडेखोर अजूनही मोकाटच आहेत. येथील एका फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये 5 संशयित दिसले आहेत. मात्र अजूनही हे संशयित पोलिसांना सापडलेले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com