
सत्ता आज आहे, उद्या नसेल आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल.
कणकवली (सिंधुदुर्ग) : सत्ता आज आहे, उद्या नसेल आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल. बस एवढंच लक्षात ठेवा की आमची सत्ता आल्यानंतर व्याजासहित हिशेब पूर्ण करू असा इशारा भाजपचे कणकवलीचे आमदार नितीश राणे यांनी आज राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे दिला. रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर काही वेळाने नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या.
गोस्वामी यांच्या अटकेनंतर अटकेच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजूनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यात नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये गोस्वामी यांचे नाव न घेता राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
नितेश राणे यांनी हिंदी मधून ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'सत्ता आज आहे, उद्या नसेल, आज तुमची आहे. उद्या आमची असेल. फक्त इतकी आठवण ठेवा, की हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के.
अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. त्यानंतर गोस्वामी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत