esakal | 'नमस्कार उद्धव साहेब...अजित दादा', चिमुकलीने मांडलं कलाकारांचं दु:ख

बोलून बातमी शोधा

artist sahyadri from kameri
'नमस्कार उद्धव साहेब...अजित दादा', चिमुकलीने मांडलं कलाकारांचं दु:ख
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कामेरी (सांगली) : नमस्कार उद्धव साहेब...नमस्कार अजित दादा...थोडं माझं ऐकून घ्या...कलाकारांना जोगवा द्या...हा कु. सह्याद्री मळेगांवकर या चिमुकल्या कलाकाराच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. कलाकाराचं दुःख काय असतं हे तिने आपल्या शब्दातून सरकारला दाखवून दिलं. ती म्हणते, कोरोनाचं संकट आलं. अशोवेऴी जगणे सुद्धा मुश्किल झालंय.

राशनचं किट मिळालं ते पण चार दिवसांत संपून गेलं. यात्रा, जत्रा सिंजन सगळा घरातं गेला. आता नवरात्र गणपती उत्सव आला. छोटं मोठं कार्यक्रम होतील तरच घर आमचं भागल, नाहीतर आम्हा कलाकारांनचं आत्महत्येच पॅकेज जाहीर करावं लागंल. कार्यक्रम सुरु झाले नाही तर घरादारावर नांगर फिरल. घरात बसून बाप माझा विचार करत राहतो. केव्हिलवाल्या नजरेनं माझ्याकडं पहातो.

होतं नव्हतं तेवढं सारं घर खर्चसाठी मोडलं‌. आज तर माझ्या आईचे मंगळसूत्र सोनाराकडं घाण पडलंय. अहो मुख्यमंत्री साहेब, मी चिमुकली आता पदर पसरुन जोगवा तुम्हाला मागते. घालाल का पदरात. माझ्यानं बघवत नाही सारं म्हणून मी बोलते. कलाकारांचे घर हे कार्यक्रमावर चालते. रंगमंचावरचा त्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरु करा, पाठीवर हात ठेवून पुन्हा लढ म्हणा. हा कलाकाराच्या व्यथा मांडणारा एका चिमुरड्या लेकीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तिचा प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या हृदयात भिडतो आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतो आहे.