
पाली : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस महाराष्ट्रातील भक्तांच्या आध्यात्मिक जीवनात विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी केवळ पंढरपूरच नव्हे तर गावखेड्यासह रायगड जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे भक्तांच्या उत्साहाने गजबजून जातात. विठ्ठल भक्तीचे हे संमेलन एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीचे एक अद्भुत दर्शन घडवते.