
देवगड : बुद्धाने शांतीचा संदेश जगाला दिला. सुखाच्या सर्वच गोष्टीत समाधान मिळेल, असे नाही. मनाच्या समाधानासाठी आत्मबोध, आत्मचिंतन याबरोबरच स्वतःमध्ये बघावे लागेल. बुध्दांची शिकवण जगाला दिशा देणारी असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी गिर्ये (ता. देवगड) येथे व्यक्त केले. मोठी ताकद बुद्धांच्या शिकवणीत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.