'नाणार'चा लढा संपला, आता मतदानाचे स्वातंत्र्य प्रत्येकाला : अशोक वालम 

प्रकाश पाटील
सोमवार, 22 एप्रिल 2019

आपला शिवसेनेला विरोध आहे का ? याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की मी शिवसेनेच्या विरोधात नाही. माझा मोदी सरकारला आहे. या सरकारनेच नाणार आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आम्ही विरोध केला. पण, गेल्या पाच वर्षातील या सरकारच्या कामगिरीवर मी वैयक्तिकरित्या समाधानी नाही. त्यामुळे "एनडीए'ला माझा विरोध आहे. शिवसेनेला नाही.

रत्नागिरी : नाणार प्रकल्प नको म्हणून आम्ही प्राणपणाने लढतो. या लढ्यात जी गावे आमच्यासोबत होती त्या गावाने कोणाला मतदान करायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. आता नाणारचा संघर्ष संपला आहे. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा नाही. ज्याला ज्या पक्षाची भूमिका पटेल त्याने ते करावे मात्र, मोदी सरकारच्या एकूनच कारभाराविषयी मी समाधानी नाही. त्यामुळे उद्या या सरकारला मी तरी मत देणार नाही अशी भूमिका कोकण रिफायणरी विरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी "सरकारनामा'शी बोलताना मांडली. 

उद्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमी त्यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले,की व्यवसायानिमित्त मी मुंबईत असतो. पण, माझी नाळ कोकणाशी जोडली गेली आहे. रत्नागिरीजवळील पडवे हे माझे मुळ गाव आहे. नाणारचा मुद्दा आणि निवडणूक याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की उद्या मतदारसंघात मतदान होत आहे. ज्या गावांनी संघर्ष केला त्या गावातील लोक ठरवतील कोणाला मतदान करायचे आहे. शेवटी पक्षभेद विसरून सर्व गावे लढ्यात सहभागी झाली होती. त्यांना चांगले वाईट समजते.'' 

आपला शिवसेनेला विरोध आहे का ? याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की मी शिवसेनेच्या विरोधात नाही. माझा मोदी सरकारला आहे. या सरकारनेच नाणार आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आम्ही विरोध केला. पण, गेल्या पाच वर्षातील या सरकारच्या कामगिरीवर मी वैयक्तिकरित्या समाधानी नाही. त्यामुळे "एनडीए'ला माझा विरोध आहे. शिवसेनेला नाही. नाणारसह जी गावे प्रकल्पाविरोधात रस्त्वावर उतरली त्याचा आम्हाला अभिमानच आहे. आता आंदोलन संपले आहे. नाणारही रद्द झाला आहे. त्यामुळे कोणाला मतदान करायचे हे त्या गावातील लोकांनी ठरवायचे आहे. शेवटी प्रत्येकाच्या मनात पक्ष असतो. बांधिलकी असते. त्यामुळे मी स्वत: कोणालाही अमूक एका पक्षाला मतदान करा असे म्हणणार नाही. शेवटी आम्ही जो लढा उभारला होता तो पक्षविरहीत होता हे ही लक्षात घेणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Walam talked about Nanar Nuclear Project and Loksabha election