अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिर 500 किलो द्राक्षाच्या तोरणांनी सजले

पालीतील श्री बल्लाळेश्वराच्या माघोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.9) नाशिक येथील उद्योजक नितीन गिरासे या भाविकाकडून ५०० किलो द्राक्षापासून बनविलेले तोरण अर्पण करण्यात आले आहे. त्याद्वारे मंदिर सजावट करण्यात आली आहे.
ashtavinayak pilgrimage shri ballaleshwar temple in Pali was decorated with 500 kg grape
ashtavinayak pilgrimage shri ballaleshwar temple in Pali was decorated with 500 kg grape Sakal

पाली : पालीतील श्री बल्लाळेश्वराच्या माघोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.9) नाशिक येथील उद्योजक नितीन गिरासे या भाविकाकडून ५०० किलो द्राक्षापासून बनविलेले तोरण अर्पण करण्यात आले आहे. त्याद्वारे मंदिर सजावट करण्यात आली आहे.

ही सजावट आकर्षक करण्यासाठी फुले, पाने यांचा देखील वापर करण्यात आला आहे. द्राक्षाच्या तोरणाने मंदिराच्या आतील सभागृह, कमान व गाभाऱ्याची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन दिवस लागले.

ही देखणी सजावट हिमानी जेटवा, पंकज राजपूत आणि त्यांच्या १५ सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. द्राक्षापासून मंदिराची केलेली सजावट बघण्यासाठी भाविकांनी, पालीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बल्लाळेश्वर मंदिरात गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com