Pali News : आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि एक्स्प्रो २०२५ मध्ये अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर देवस्थान सहभागी

श्री क्षेत्र तिरूपती येथे अधिवेशनात सुमारे ३२ देशांतील, हिंदु, बौध्द, जैन व शीख धर्मांची १५०० मंदिरे म्हणजेच त्यांचे विश्वस्त व प्रतिनिधी एकत्र आले होते.
international temple session and expro 2025
international temple session and expro 2025sakal
Updated on

पाली - श्री बल्लाळेश्वर देवस्थान विविध उपक्रमांतून प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जगभरातील मंदिरांना एकत्र आणणारी संस्था टेंपल कनेक्ट या संस्थेद्वारे सोमवार (ता. 17) ते बुधवार (ता. 19) आयोजित आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि एक्स्प्रो २०२५-ITCX25 या अधिवेशनात श्री बल्लाळेश्वर देवस्थान सहभागी झाले होते.

श्री क्षेत्र तिरूपती येथे या अधिवेशनात सुमारे ३२ देशांतील, हिंदु, बौध्द, जैन व शीख धर्मांची १५०० मंदिरे म्हणजेच त्यांचे विश्वस्त व प्रतिनिधी एकत्र आले होते. याद्वारे मंदिरासाठी सर्वच दृष्टीने एक शक्तीशाली नेटवर्किंग तयार करून व त्या अनुषंगाने मंदिरांचे संवर्धन, व्यवस्थापन अशा अनेक विषयांसाठी या अधिवेशनाचे व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचे आमंत्रण श्री बल्लाळेश्वर देवस्थानला आले.

अशा प्रचंड भव्य, महत्वाच्या, मानाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण येणे आणि त्यात सहभागी होणे हा एक ऊत्तम दैवयोगच आला असे बल्लाळेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले. अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांच्यासमवेत विश्वस्त डॉ. पिनाकीन कुंटे व विश्वास गद्रे या दोन विश्वस्त यांनी या अधिवेशनाला हजेरी लावली. जितेंद्र गद्रे यांनी या भव्य व्यासपीठावर आपले विचार मांडले. अशा कार्यक्रमांमधे सहभाग मिळून देवस्थाचा विकास होईल. असे मत अनेकांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com