शिवसेनेने जनतेला काय दिले ते विचारा, माजी खासदार नीलेश राणे यांचा सवाल

Ask what Shiv Sena given to people question of former MP Nilesh Rane
Ask what Shiv Sena given to people question of former MP Nilesh Rane
Updated on

राजापूर ( रत्नागिरी ) - केवळ भावनिक राजकारण करून सत्ता मिळविणे आणि सत्तेच्या माध्यमातून व्यापारी आणि ठेकेदारी करणे हाच शिवसेनेचा अजेंडा आहे, असा घणाघात माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर केला. रस्ते, वीज, पाणी, गटारे या समस्या आहेतच, परंतु त्यापलीकडेही विकास असतो. मात्र ज्या शिवसेनेला सगळी सत्तास्थाने दिलात त्या शिवसेनेने तुम्हाला काय दिले हे तुम्ही शिवसेनेला कधी विचारणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने लोकांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार राणे तालुका दौऱ्यावर आले होते. ससाळे - शिंदेवाडी येथे त्यांची सभा झाली. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपच्या महिला आघाडीच्या उल्का विश्वासराव, डॉ. माधव सप्रे, माजी तालुकाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, चंद्रकांत लिंगायत, गावकर चंद्रकांत शिवगण, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, स्थानिक तरुणांना रोजगार, शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शिवसेनेने काय केले? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करावयाचा असतो ती जिल्हा परिषदच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिवाळखोरीत घालविली आहे. जनतेने तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिलेल्या राजन साळवी यांनी मतदारसंघात कोणता विकास केला? ग्रामपंचायती या ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे गावांसह ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर भाजपला बहुमताने निवडून द्या. 

दीपक बेंद्रे यांनी करून ग्रामपंचायत निवडणूक, केळवली पंचायत समिती गणात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी शिंदेवाडी प्रमुख शांताराम जोगले, प्रभाकर प्रभुलकर, नारायण शिवगण, प्रदीप शिंदे, विजय गरूड, चंद्रकांत शिंदे, दत्ताराम चंदुरकर उपस्थित होते. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com