फक्त वीस सेकंद, पाच गवे आणि दहा फुट अंतर ; हुशारीमुळेच वाचला जीव

attack a forest by son on two wheeler driver in sindhudurg also five animal has seen
attack a forest by son on two wheeler driver in sindhudurg also five animal has seen
Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) : मडुरा येथून परतत असताना पाडलोस-केणीवाडा येथे दुचाकीस्वाराला भल्यामोठ्या गव्याने धडक दिली. दुचाकीच्या पुढील चाकाला धक्का देत गव्याने साळगावकर यांच्या बागेत पलायन केले. पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अजून पाच गव्यांचा कळप रस्त्यावरून येत असल्याचे पाहताच मोठ्याने हॉर्न वाजवून सर्वांना सावध केले. त्यामुळे त्या गव्यांनी गाडीच्या दहा फूट समोरून लगतच्या जंगलात धूम ठोकली.

वाहनचालकांनी दाखविलेल्या हुशारीमुळे थोडक्‍यात मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. बांदा-शिरोडा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे रानटी प्राण्यांचा रस्त्यावर वावर मोठा आहे. झुडपे तोडण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. बुधवारी रात्रो साडेआठ वाजताच्या सुमारास केणीवाडा येथील सुजीत परब हे दुचाकीवरून मडुऱ्याहून घरी परतत असताना अचानक भल्यामोठ्या गव्याने गाडीच्या पुढच्या चाकासमोर उडी घेतली.

गाडीचा वेग कमी असल्याने त्यांनी ब्रेक लावला. त्यांच्या पाठीमागून येत असलेले समीर नाईक यांनी अन्य पाच गवे पुन्हा त्या गव्याच्या पाठोपाठ येत असल्याचे पाहीले. ग्रामस्थांचा जीव धोक्‍यात असल्याचे पाहून त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवत सुजीत यांना जलद रस्त्यात गाठले. केवळ वीस सेकंदात पाच गवे दहा फुट अंतरावरून गेल्याचे समीर नाईक यांनी सांगितले. यावेळी रोहन सातार्डेकर, निखील परब, संकेत गवस उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com