
सावंतवाडी : रूरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतमालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी गाव, तालुका व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्याअनुषंगाने मराठी नव उद्योजकांची नजीकच्या काळात एक कार्यशाळा आयोजित करून त्यांना उद्योगधंद्यांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती रूरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडेकर (अमरावती) यांनी दिली.