दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव कवडीमोल दराने

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

तब्बल सातपैकी सहा मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

खेड (रत्नागिरी) :  कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या खेड तालुक्‍यातील तब्बल सातपैकी सहा मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

या लिलावात दिल्ली येथील दोन व्यक्तींनी कवडीमोल दरात कुख्यात गुंड दाऊदच्या मालमत्तांची खरेदी केली. आज सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी स्मगलर फॉरेन एक्‍सचेंज मेनिपुलेटर ॲक्‍ट अर्थात साफेमा एनडीपीएसएचे कमिशनर हरिगोविंद सिंघ व ॲडीशनल कमिशनर आर. एम. डिसुझा यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. या लिलावमध्ये खेड तालुक्‍यातील मुंबके या दाऊदच्या मूळ गावातील सहा मालमत्तांचा समावेश होता.

हेही वाचा - यंदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या कृषी प्रदर्शनाला ब्रेक -

ज्यामध्ये शेतजमिनीसह त्याच्या अर्धवट अवस्थेतील बंगल्याचा देखील समावेश होता. दाऊद याच्या २७ गुंठे जमिनीतील बंगल्याचा ११ लाख २० हजार रुपयांमध्ये लिलाव झाला. तर इतर पाच जमिन जागांचा एकूण ११ लाख ५९ हजार ६०० रुपयांना लिलाव झाला. कुख्यात गुंड व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्‍यातील मालमत्तांची खरेदी दिल्ली येथील भुपेंद्र भारद्वाज व अजय श्रीवास्तव यांनी केली.

सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू झालेली लिलावाची प्रक्रिया दुपारी १ वाजता संपली. दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्‍यातील एकूण सात मालमत्तांचा लिलाव १० नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे साफेमाने आधीच घोषित केले होते. आज झालेल्या लिलावात दाऊदच्या सात पैकी सहा मालमत्तांचा लिलाव झाला असून लोटे येथील एका मालमत्तेचा लिलाव यावेळी मागे घेतला.

हेही वाचा -  पोटदुखी सहन न झाल्याने पोट फाडून घेऊन डॉक्‍टरची आत्महत्या -

ती मागणी अमान्य

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव हा अत्यंत कवडीमोल दरामध्ये झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. खेड तालुक्‍यातील मुंबके गावातील मालमत्तांचा लिलाव करताना स्थानिकांचा विचार केला जावा, ही स्थानिकांची मागणी मान्य झाली नाही.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auction of daud property in khed in very small amount in ratnagiri