esakal | लेखक मधुकर जाधव यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

लेखक मधुकर जाधव यांचे निधन 

चिपळूण - येथील डीबीजे महाविद्यालयातील मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक मधुकर जाधव यांचे सोलापूर येथे निधन झाले. गेले काही दिवस ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. 

लेखक मधुकर जाधव यांचे निधन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - येथील डीबीजे महाविद्यालयातील मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक मधुकर जाधव यांचे सोलापूर येथे निधन झाले. गेले काही दिवस ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. 

प्रा. मधुकर जाधव यांनी मराठीत विपूल प्रमाणात विविध विषयावर लेखन केले होते. 21 पुस्तके, 180 प्रकाशित लेख, आकाशवाणीर व्याख्याने, संत साहित्य अशा अनेक विषयात संचार केला. भूत भानामती, जादुटोणा व शोध भुताचा या पुस्तकास राज्य सरकारचा पुरस्कार, संत सेना महाराज - चरित्र आणि कार्य, भारतीय सण आणि उत्सव, पुण्यश्‍लोक आप्पासाहेब वरद, अंधश्रद्धा आणि नवी दृष्टी अशा विविधांची विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध वर्तमानपत्रताही त्यांनी स्तंभलेखन केले. ते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व मुंबई विद्यापीठ समितीवर 26 वर्षे कार्यरत होते.

मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ तसेच संपादक मंडळाचे सदस्य होते. बरेच वर्ष मराठा सेवा संघ या चळवळीत त्यानी काम केले. त्यांना आदर्श प्राध्यापक, गुरूवर्य, प्रौढशिक्षण कार्यकर्ता, व्यसनमुक्ती, कै. नानासाहेब शेटे कार्यकर्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-दलितमित्र आदी पुरस्कार मिळाले होते. 

लेखकाला चिपळूणची जनता मुकली.. 
त्यांच्या निधनाबद्दल डीबीजे महाविद्यालय परिवार व विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. प्रा. मधू जाधव यांच्या निधनाने एका प्राध्यापकाला आणि सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमात हिरीहिरीने सहभागी होणाऱ्या लेखकाला चिपळूणची जनता मुकली, अशा शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली. 

loading image
go to top