संपूर्ण जगात बॉम्बे बल्ड ग्रुप अत्यंत दुर्मीळ आहे. सुमारे एक लाखामागे अवघ्या १० जणांमध्ये हा रक्तगट आढळून येतो.
दापोली : संपूर्ण जगात अतिदुर्मीळ ओएचएच अर्थात् बॉम्बे ब्लड ग्रुपच्या (Bombay Blood Group) मराठी तरुणांच्या मदतीने कर्नाटकातील बाळाला जीवदान मिळाले आहे. यामध्ये कोकणातील (Konkan) दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील ओंकार धनावडे याच्या रक्तदानामुळे विजापूर या ठिकाणी एक वर्षाच्या बाळावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली.