सिंधुदुर्गातील शिमगोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी 

0
0
Updated on

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई, पुण्यावरून नागरिक येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यंनी शनिवारी शिमगोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. मुंबई, पुणे किंवा अन्य भागातून प्रतिबंधित क्षेत्रामधून जिल्ह्यात येणाऱ्यांकडे 72 तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे आवश्‍यक आहे. 

मार्गदर्शक सूचनेनुसार, कोणत्याही परिस्थितीत 50 लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत, याची दक्षता मंदिर विश्‍वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, ग्राम नियंत्रण समिती यांनी घ्यायची आहे. पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारित कराव्यात. होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ आदी स्वरुपात स्वीकारु नयेत. प्रसाद वाटपही नको. सहाणेवर पालखी व होळीच्या दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा किंवा या कालावधीत 3-3 तास नेमून द्यावेत. त्याने एकाच वेळी गर्दी होणार नाही. 
उपस्थितांनी योग्य सामाजिक अंतर ठेवणे व मास्क घालणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होईल. उपस्थित सर्वाचे थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक आहे. सर्वांनी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी उदा. दरवाजाचे हॅंडल आदींचे वारंवार निर्जतुकीकरण करणे बंधनकारक आहे. शिंकताना किवा खोकताना टिश्‍यू पेपर किवा हातरुमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल, याची दक्षता घ्यावी. वापरलेल्या टिश्‍यू पेपरची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. परिसरात थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. याचे उल्लंघन केल्यास दंड होईल. 

सर्दी, खोकला व इतर कोविड सदृश्‍य लक्षणे असलेल्या नागरिकास शिमगोत्सवात सामील होता येणार नाही. त्याबाबत ग्राम नियंत्रण समितीने दक्षता घ्यावी. समितीने 50 पेक्षा अधिक लोक नसतील, याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्यास आणि कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र होईल. नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. सण सुरू होण्याच्या कालावधीत काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील पालन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. 

मुंबईकरांना शक्‍यतो गावी न येण्याचे आवाहन करावे, होळीची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक व वेबसाईट आदी माध्यमांद्‌वारे द्यावी. त्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतच थांबून होळीचा कार्यक्रम पहाणे शक्‍य होईल. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील लोकांना टेस्टिंग व थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील. ग्राम नियंत्रण समितीने शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत. त्याबाबत जनजागृती करावी. स्क्रिनिंग सेंटरवर नागरीकांमध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवावे. 

घरोघरी पालखी नेणे, शबय मागण्यास मनाई 
पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये. होळी हा पारंपरिक सण आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छोट्या होळ्या आणून मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करणे. शबय मागणे, गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम टाळावेत. धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याचे टाळावे. 

या आहेत सूचना 

  • सर्व मंदिर विश्‍वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन चाचणी करुन घेणे आवश्‍यक 
  • सर्व मंदिर विश्‍वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीतच धार्मिक कार्यक्रम पार पाडणे बंधनकारक 
  • सर्व मंदिर विश्‍वस्त व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी कमीत कमी ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल याची दक्षता घ्यावी 
  • पालखी शक्‍यतो वाहनातून नेण्यास प्राधान्य 
  • वाहनातून नेण्यास शक्‍य नसल्यास अशा वेळी पालखी धारकांनी स्वतः वाहून नेणेस परवानगी राहील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com