खारेपाटणमधून प्रवास करताय? सावधान...!

bad road kharepatan konkan sindhudurg
bad road kharepatan konkan sindhudurg

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात खारेपाटण प्राधिकरण कार्यालयाजवळ मोठे भगदाड पडले आहे. यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे. प्राधिकरण कार्यालयाजवळ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम प्रत्येक दिवशी खचत चालला आहे. यामुळे रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

सर्व्हीस रस्ता सिमेंट कॉंक्रीट टाकून पुन्हा खचलेला मार्ग बनविण्यात आला. त्यावरून वाहतूक सुरू झाली. रात्री सर्व्हीस रोडच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले. या भरावाला अनेक प्रकारे डांबरीकरणाची खडी आणून बसविण्यात आली. त्यावर सिमेंट कॉंक्रीट ओतण्यात आले. तरीही वेगवेगळ्या ठिकाणी मोठे भगदाड पडत असल्याने संपूर्ण मार्गाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने चौकशी करावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

सलग दोन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण भराव धोकादायक झाला आहे. खोल दरीत भराव कोसळल्यास मोठी दूर्घटना घडू शकते. या सर्व्हीस रोडवरील वाहतुक धोकादायक बनली आहे. संपूर्ण भरावाचे काम पुन्हा करणे आवश्‍यक आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com