रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?

पल्लवी सावंत
Sunday, 11 October 2020

यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधावे, अशीही मागणी होत आहे. 

नांदगाव (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणारा सावडाव फाटा ते ओटवला जोडणारा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. यामुळे स्थानिक व पर्यटकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. या कामासाठी तातडीने विषेश बाब ठरवून निधी मंजूर करावा, अशी मागणी येथील नागरीक व पर्यटक करीत आहेत. यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधावे, अशीही मागणी होत आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरुन सावडाव फाटा येथून सावडावातून जाणारा रस्ता ओटवला जोडला जातो. येथून नांदगावकडेही येता येते; मात्र पावसाळ्यात सावडाव फाटा ते ओटवपर्यंत असणाऱ्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे सावडाव ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्तावर नांदगाव, सावडाव, ओटव, माईण भागातील नागरिक मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या नांदगाव व सावडाव फाटामार्गे शहराकडे जाणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

सावडाव पर्यटनस्थळ 
सावडाव हे पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित झाले आहे; मात्र म्हणाव्या तशा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्यात हा रस्ताही खराब असल्याने त्याची तातडीने डागडुजीसह विशेष बाब म्हणून निधी मंजूर करुन यावर्षी डांबरीकरण गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात येथील रस्त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad road in savdav fata to Ottawa village sindhudurg district