esakal | अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वाशीष्टी पुलावरील वाहतूक सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वाशीष्टी पुलावरील वाहतूक सुरू

sakal_logo
By
नागेश पाटील -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: गेल्या चार वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील प्रतीक्षेत असलेला वाशिष्ठी पूल आज शनिवारपासून वाहतुकीस खुला झाला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत वाशिष्ठी पुलावरील वाहतूक खुली करण्यात आली. या पुलावरील एकेरी वाहतूक सुरू झाली असून दोन महिन्यात दुसरा मार्गही सुरू होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

बहादूर शेख नाका येथील ब्रिटीशकालीन ८१ वर्षाचा असलेला वाशिष्ठी पूल धोकादायक झाल्याने त्या पुलास नवीन पर्यायी पूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने केली जात होती. यासाठी चिपळूणकरांनी अनेकदा रास्ता रोकोसह आंदोलनेही केली.

हेही वाचा: रत्नागिरीत लेखी परीक्षेला 3,297 उमेदवारांची दांडी

दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर या पुलाच्या कामास चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात सुरु केलेल्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट ठेवले होते. त्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या चेतक कंपनीलाच उर्वरित पुलाच्या कामाचा ठेका देण्यात आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने या पुलाच्या कामास गती मिळाली.

गेले तीन वर्ष या पुलाचे काम सुरू होते. गेल्या आठवड्यात पुलाचे दोन्ही बाजूचे जोड रस्ते तसेच पलोड टेस्टिंग व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर शनिवारी 4 सप्टेंबरला या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. सध्याच्या गणेशोत्सवाच्या कालावधीत वाशिष्ठी पूल वाहतुकीस खुला झाल्याने चाकरमान्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे.

loading image
go to top