बाळासाहेबांनी मला शाबासकी दिली असती : नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

आज बाळासाहेब असते, तर त्यांनी मला शाबासकी दिली असती. नीतेश शाबास तू चांगल काम केले आहेस, असे ते म्हणाले असते. बाकी कोणाला आंदोलन आवडले की नाही हे मला माहिती नाही. आम्ही कोणाला मारण्यासाठी रस्त्यावर गेलो नव्हतो.

सिंधुदुर्ग : शासकीय अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर येताच नीतेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले. ते म्हणाले, की आज बाळासाहेब असते तर मला शबासकी दिली असती.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेकप्रकरणी कारागृहात असलेले आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 जणांची बुधवारी रात्री सावंतवाडी कारागृहातून सुटका करण्यात आली. नीतेश राणेंसह 19 जणांना बुधवार जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानतर त्यांची सुटका करण्यात आली. मी नागरिकांसाठी आंदोलन केले आणि मला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे राणे यांनी सुटकेनंतर सांगितले.

राणे म्हणाले, की आज बाळासाहेब असते, तर त्यांनी मला शाबासकी दिली असती. नीतेश शाबास तू चांगल काम केले आहेस, असे ते म्हणाले असते. बाकी कोणाला आंदोलन आवडले की नाही हे मला माहिती नाही. आम्ही कोणाला मारण्यासाठी रस्त्यावर गेलो नव्हतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thackeray would have praised my agitation says Nitesh Rane