बांदा-गडगेवाडीत परप्रांतीय कामगाराचा खून

बांदा-गडगेवाडीत परप्रांतीय कामगाराचा  खून
Updated on: 

बांदा (सिंधुदुर्ग):सावंतवाडी तालुक्यातील बांदा-गडगेवाडी(Banda-Gadgewadi)येथे एका परप्रांतीय कामगाराचा अंतर्गत वादातून खून झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे. विश्वजित कालिपत मंडल (वय ३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे त्याचे नाव आहे. सदर कामगार ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर यांच्याकडे भाड्याने राहत होता. त्याच्या सोबत पत्नी, मुलगी व मुलगा होता. दोन्ही मुले आज सकाळी जोरजोराने आपल्या वडिलांना हाक मारत होती. हे ऐकून मकरंद तोरसकर यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे तोरसकर यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विश्वजित खाली कोसळलेला निदर्शनास आला. यावेळी पत्नी व मुले दुसर्‍या खोलीत होती. त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी होती.

विश्वजित याच्या छातीवर खोल जखमा आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञाताने त्याच्यावर खूनी हल्ला केल्याची शक्यता आहे. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे सहकारी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी अमोल बंडगर, संजय हुंबे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर हळदे, राजाराम कापसे, होमगार्ड विश्वजित भोगटे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक रोहिणी साेळंखे याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा पोलीसांचे श्वानपथकही घटनास्थळी आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी देखील घटनास्थळी येत माहिती घेतली. व स्थानिक पोलिसांना सूचना दिल्यात.

मयताच्या शरीरावरील जखमा पाहता विश्वजित याचा घातपात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. पोलीस तपासात अद्यापपर्यंत कोणतेही धारदार शस्त्र सापडलेले नाही पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करीत आहेत. बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर घटनास्थळी उपस्थित होते. बांदा पोलीसात या घटनेची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. सदर घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. खुनाचा माग काढण्यासाठी आणण्यात आलेले श्वान घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर शेटकरवाडीपर्यंत जाऊन घुटमळले. यातून काहीही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com